प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी सुनील पाटील
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
बुधवार दिनाकं 17 ऑक्टोबर 2021 रोजी *हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे* यांच्या पवित्र स्मृतीस दादर शिवाजी पार्क येथील जाऊन साहेबांच्या स्मृतीस्थळावर *रायगड जिल्हा प्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर,विनम्र अभिवादन केले, तसेच त्याच्या सोबत असलेले उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपतालुकासंघटक अमित भगत, ग्रा.पं. सदस्य धनेश ठाकूर यांनीही शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे* याना अभिवादन केले.