डेंग्यूचे डास एका विशिष्ट वेळीच चावतात आणि काही विशिष्ट ठिकाणीच असतात जाणून घ्या केव्हा आणि कुठे..

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

देशातील अनेक राज्यात डेंग्यूचे संक्रमण अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. डेंग्यूचे संक्रमण हे एरिस मच्छर चावल्यामुळे पसरतो. यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्वाची.

डेंग्यूचे विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पोहचत नाहीत. तर डेंग्यूचे संक्रमण DEN-1, DEN-2, DEN-3 आणि DEN-4 विषाणूंद्वारे पसरते. या चार विषाणूंना ‘सेरोटाइप’ असे म्हणतात कारण ते प्रतिपिंडांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. त्यामुळे वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही.

महत्वाचे म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित होऊ शकतो. डेंग्यू पसरवणारे मच्छर खास करून दुपारच्या वेळी चावतात. खास करून सूर्योदयाच्या 2 तासानंतर आणि सूर्यास्ताच्या एक तास अगोदर ते सक्रीय असतात. तसेच सर्वाधिक उजेड असलेल्या ठिकाणी रात्री देखील डेंग्यूचे मच्छर सक्रीय असू शकतात. डेंग्यूच्या मच्छरांचा चावण्याचा धोका ऑफिस, मॉल, ऑडिटोरिअम, इनडोअर, स्टेडिअम सारख्या ठिकाणी जास्त असतो. कारण या ठिकाणी आर्टिफिशिअल लाईट्स अधिक असतात.

लक्षणे किती दिवस आणि कोणती..

डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे जवळपास 10 दिवस राहतात. अचानक तापयेणं, डोके दुखी, डोळे दुखणे, सांधे दुखणे, अधिक थकवा जाणवणे, अशक्तपणा, त्वचेवर लाल चट्टे आणि नाकातून रक्तस्त्राव. हि डेंग्यूची लक्षणे आहेत. तसेच संपूर्ण शरीरात खूप त्रास जाणवतो.

शरीरावर होणारा परिणाम.

शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. एवढंच नव्हे तर याकाळात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. तसेच या दिवसात लिक्विड डाएट खूप महत्वाचा आहे.

आहार कसा असावा..?

या काळात नारळ पाणी प्या. तसेच पपई, किवी, डाळिंब आणि हिरव्या रंगाच्या भाज्या खाणं अधिक फायदेशीर असते. सतत आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा.


Post a Comment

Previous Post Next Post