माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सन्मान.
प्रेस मेडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
सन्मानापासून दूर राहिलेल्या व्यक्तिंचा सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भेटवस्तू,शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आला.
या मध्ये रसायनी परिसरात अनुभवी सुईंनबाई म्हणून भागिरथी राघो नाईक, आनंदीबाई बामा पारंगे, बाळ जन्मानंतर आया म्हणून काम पाहणा-या अनिता रघुनाथ धुरव, सुलोचना किशोर क्षीरसागर, स्मशानभुमीवर अंत्यविधी प्रसंगी केस कापणारे न्हावी मामा जयकुमार गायकवाड, संतोष गायकवाड, अशोक जाधव,उत्तम क्षीरसागर, कोरोना काळात कोरोना रुग्णांची सेवा करणारी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीयल मेडिकल असोसिएशन, रसायनी परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी रसायनी क्रिकेट असोसिएशन, कोरोनाकाळात भक्तिगीत व पोवाड्यातून जनजागृती करणारे जनार्दन गायकवाड,कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती संदेश मानकामे, सफाईं कर्मचारी म्हणून दत्ता शिंदे, गोविंद जाधव,अशोक सोनावळे, दत्तात्रेय खारकर,दिपक कुरंगळे,संजय शिंदे, संगीत भजनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे महिला बचत गट म्हणून श्री गणेश महिला बचत गट, रिद्धी सिद्धी महिला बचत गट, जय पुर्णंवाद महिला बचत गट,स्वावलंबन महिला बचत गट तसेच कर्तंव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून कैलास दादाभाऊ डोंगरे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक रसायनी पोलिस ठाणे, अनिल विभूते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खालापूर यांना सन्मानित करण्यात आले.