प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
हैदराबाद येथे दिनाकं 17 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत *कु साईराज जगदीश भोईर* या नवीन शेव्यातील उदयमुख खेळाडूने *फर्स्ट रँक 120 प्लस कॅट्यागिरी मध्ये एकूण 628 किलो वजन उचलून गोल्ड मेडल* मिळविले आहे. तसेच गेल्या महिन्यात कु साईराज भोईर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले होते, या त्याच्या उत्तम कामगिबद्दल *शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कु साईराज यास पुढील वाटचालीस शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिला आहे.
या वेळी कु साईराज चे वडील श्री जगदीश भोईर, उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक श्री अमित भगत व भुपेंद्र भोईर उपस्थित होते, तसेच कु साईराज याचे नगरसेवक अतुल ठाकूर, विधी सेलचे तालुका अध्यक्ष मच्छिद्र घरत, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील व मानिराम पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.