प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
रत्नागिरी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख आणि साखरपा परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत. रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. नागरिक गाढ झोपेत असल्याने भूकंपाचे धक्के जाणवताच परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान भूकंप होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहाणी झाली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, देवरूख, साखरपा परिसरात रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तर या भूकंपाची तीव्रता चार रिश्टर स्केल असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र हे मुंबईपासून सुमारे 350 किमी अंतरावर होतं. दरम्यान, एका महिन्याच्या आतच रत्नागिरी जिल्ह्याला दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हे सुद्धा वाचा....
या घटनेचा आढावा घेण्याचं काम सुरू असून जिवीतहाणीची बातमी अद्याप तरी समोर आली नसल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर महिन्याभरातच झालेल्या दोन भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत.