शिवसेना उरण अल्पसंख्याक सेलच्या नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

 





प्रेस मीडिया वृत्तसेवा 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


*हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे* यांच्या आशीर्वादाने, *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे*, *युवासेना प्रमुख मा. श्री आदित्यजी ठाकरे* यांच्या आदेशाने तसेच *शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार  रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी शिवसेना उरण अल्पसंख्याक सेलच्या नवीन पदाधिकारी नियुक्या जाहीर केल्या आहेत. या मध्ये *उरण तालुका अध्यक्ष पदी परेश मेहता, उरण शहर अध्यक्ष पदी शादाब शेख, तालुका चिटणीस पदी मुस्तफा सय्यद* यांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत.

आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा *माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी *उरण नगरपालिका  गटनेते श्री गणेश शिंदे* , उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपतालुका संघटक श्री अमित भगत, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वर कुरेशी, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, युवा अध्यक्ष अरम शेख,  विभागप्रमुख आयुब मीर, गुलजार भाटकर, नागाव सरपंच सी के गायकवाड, माजी सरपंच मोहन काठे,व मुस्लीम कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post