प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.
नोकरदार वर्गासाठी पीएफ खात्यातील रक्कम मी भविष्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक समजली जाते या पीएफ मधील रकमेचा उपयोग हा लग्नासाठी तसेच अन्य महत्त्वाच्या कामासाठी केला जातो.नोकरदार वर्गाला दिलासा देणारी बातमी आहे. ईपीएफओच्या एका बैठकीत घेतललेल्या निर्णयामुळे सर्व पीएफ धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नक्की काय आहे निर्णय..?
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची आज बैठक पार पडली. या बैठकीत PF ट्रान्सफरबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला. PF अकाउंटच्या सेंट्रलाइज IT सिस्टिमलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. सेंट्रलाइज सिस्टिममुळे खाताधारकाचे वेगवेगळे अकाऊंट एकत्र केले जातील.
निर्णयाचा फायदा काय..?
नोकरी सोडल्यानंतर दुसऱ्या कंपनीत रुजु होतो. तेव्हा तो कर्मचारी आधीच्या कंपनीतील पीएफ खात्यातील रक्कम ही काढतो किंवा दुसऱ्या कंपनीच्या खात्यात वळते करतो.
ही सर्व प्रक्रिया त्या पीएफधारकाला करायला लागायची. अनेकांना ही प्रक्रिया कशी करतात, हे माहिती नसल्याने पैसे मोजावे लागतात. मात्र इपीएफओच्या बैठकीत झालेल्या या निर्णायमुळे पीएफ ट्रान्सफर करण्याची डोकेदुखी कायमची मिटणार आहे. तसेच नोकरी बदलली तरी पीएफ अकाऊंट नंबर कायम राहणार आहे.
आताचे नियम काय आहेत..?
सध्याच्या नियमांनुसार नोकरी सोडल्यानंतर जुन्या आणि कामाच्या नव्या ठिकाणी पीएफधारकाला कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या सर्व किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेक पीएफधारक हे ती रक्कम नोकरीच्या नव्या ठिकाणी ट्रान्सफर करत नाहीत.
नव्या कंपनीत आधीच्या यूएएन क्रमांकाच्या आधारे दुसरं पीएफ खातं तयार केलं जातं. यामध्ये पीएफ खात्यातील एकूण रक्कम दाखवली जात नाही, कारण पीएफ धारकाने आधीच्या कंपनीतील पीएफची रक्कम ट्रान्सफर केलेली नसते. मात्र या नव्या निर्णयामुळे ही सर्व डोकेदुखी दूर होणार आहे.