प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी: सुनील पाटील :
रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, रायगड शिव सम्राटचा यावर्षीचा दिवाळी अंक हा आरोग्य विषयक माहितीनी परिपूर्ण भरलेला असून तो जतन प्रत्येकाने करण्यासारखा आहे. तरी या दिवाळी अंकाचा वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले, ते पुढे म्हणाले की, संपादक रत्नाकर पाटील यांच्या दिवाळी विशेषांकाचे वैशिष्टे असे की, ते शिवप्रेमी आहेत, म्हणून त्यांच्या प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रभाग ड सभापती सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, दैनिक वादळवाराचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार विजय कडू, पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख नितीन देशमुख, महासंघाचे सदस्य पत्रकार सुभाष वाघपंजे, शिवतेजचे कार्यकारिणी सदस्य मिलिंद तारी, प्रथमेश रेवाळे, समाजसेवक नितीन चोरघे, जितेंद्र वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.