रायगड जिल्ह्यातील मिठाई उत्पादक विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दिवाळी या सणाच्या घ्यावयाच्या दक्षता.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


सणासुदीच्या कालावधी मध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्नपदार्थ आहे असे खवा .मावा .घी. रवा. मैदा. आटा . खाद्यतेल वनस्पती इत्यादी चे मागणी मोठ्या प्रमाणात केले जाते त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील मिठाई उत्पादक विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घ्यावी सुचना खालील प्रमाणे दिलेले आहेत.

आस्थापणेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व कीटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक नोंदणी धारक अण्ण व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित झाकून ठेवावेत.

आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा 100 ppm पेक्षा कमी.

मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्या योग्य व दिनांक युज बिफोर टाकावा.

बंगाली मिठाई जी चोवीस तासाच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे. मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्ती नेहमी डोक्यावर टोपी मास्क हात मोजे स्वच्छ वापरावेत.

 मिठाई वर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे उच्च प्रतीचे असावे मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावेत  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेत.

रायगड जिल्ह्यातील मिठाई उत्पादक विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी वरील प्रमाणे नमूद केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्नपदार्थाच्या सेवनामुळे विषबाधा सारखे अप्रिय घटना घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आव्हान अन्न औषध प्रशासन म राज्य रायगड पेन कार्यालयाकडून करण्यात आले आहे

सायक आयुक्त (अन्न) पदावधीत अधिकारी अन्न व औषद प्रशासन (ल.अ.दराडे)म.राज्य रायगड पेन यांनी सूचित केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post