प्रेस मीडिया वृत्तपत्र
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
भाऊ बीज
भाऊबीज म्हणजे भावा - बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. तर हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते.
रायगड - भाऊबीज म्हणजे बहीण - भावाच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील. व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस म्हणजे दिपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात यमद्वितीया दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, अशी आख्यायिका या सणाबाबत आहे. त्यामुळेच हा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित दिवस समजला असल्याने मोठ्या उत्साहात सण झाल्याने संपूर्ण खालापूर तालुक्यात बहीण भावांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण भाऊबीज भावाच्या दीर्घायुष्यासाठी केली देवाकडे मनोभावे प्रार्थना
भाऊबीज म्हणजे भावा - बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. तर हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असते. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावतात. बहिणीची ओवाळणी तर हा टिळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्राला आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहिणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचे कौतुक करतात. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी. व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. त्यामुळे बहिण भावाच्या नात्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाचा असल्याचे प्रत्येक भाऊ बहीणी या सणाबाबत आदर असतो.