त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात दि.१८ रोजी गुरुवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरी वात अर्थात दिव्यांची वात लावली जाते,  हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो, त्याचेच औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकरापुढे आरती व त्रिपुर वात लावून दरवर्षी प्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला, याचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा मंदिराचे विश्वस्त उमेश इनामदार यांनी केले होते.

यावेळी मंदिराचे विश्वस्त राजेश खरे, उद्योजक शीतल कोठारी, पत्रकार संजय कदम, प्रज्ञा राऊत, स्वाती पवार, वैभवी गुरव, भारती आटवणे आदी भाविकगण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post