आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड


प्रेस मीडिया वृत्तपत्र.

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

Wifi range extender  । स्मार्टफोन असो किंवा स्मार्टवॉच सर्व काही खूप वेगाने विकसित होत आहे.

सध्या प्रत्येकाला मजबूत कनेक्टिव्हिटी पाहिजे, अशावेळी वाय-फाय (Wifi) ची लिमिटेड रेंज एक मोठे आव्हान बनली आहे, परंतु आता लवकरच वाय-फाय वापरणार्‍यांचा अनुभव बदलणार आहे. एका रिपोर्टनुसार, वाय-फाय अलायन्सकडून एक नवीन वाय-फाय तंत्रज्ञान विकसित (Wifi Range Extender) केले जात आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेवूयात –

काय आहे नवीन तंत्रज्ञान –

या नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाय-फायचे नाव हॅलो वाय-फाय (Halow Wifi) आहे. एका रिपोर्टनुसार यामध्ये 1 किमीची रेंज मिळेल. यास नेक्स्ट-जेनरेशनचे वाय-फाय मानले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाय-फाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) पाहात तयार केले जात आहे.

कसे करेल काम –

सध्याच्या वाय-फाय तंत्रज्ञान बँडविद्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर काम करते. तर नवीन तंत्रज्ञानाचे वाय-फाय 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर काम करण्यासाठी विकसित केले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित हॅलो वाय-फाय वीजेचा खप कमी करेल. परंतु ते लो फ्रीक्वेन्सी (Low Frequency) वर डेटा सिग्नल (Data Signal) ट्रान्समिट करण्यात सक्षम आहे.

स्पीडवर होईल परिणाम –

डेटा स्पीड कमी राहण्याची शक्यता आहे, कारण हे लो स्पेक्ट्रमवर काम करेल, त्याच्या डेटा ट्रान्सफरचा स्पीड सामान्य वाय-फायपेक्षा कमीअसेल. मात्र, यामुळे ज्या डिव्हाईससाठी (IOT डिव्हाईस) बनवले जात आहे, अशा डिव्हाईसला वेगवान वाय-फाय स्पीडची आवश्यकता भासत नाही. (Wifi Range Extender)

Web Title :- Wifi Range Extender | wifi halow might be future long range iot applications Wifi Range Extender

 आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे appeared first on Sarkarsatta.

Post a Comment

Previous Post Next Post