अपघात वृत्त : दारूच्या नशेत ड्रायव्हरने भरधाव वेगात दिंडीत गाडी घुसवली.

 दोन महिला जागीच ठार तर दोन महिला गंभीर अवस्थेत होत्या त्यांचे ही निधन झाले.


तालुक्यातील उंबरे या गावातून येरम बुवा यांच्या दिंडीला वडगाव ते मावळ हद्दीत दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरने भरधाव वेगात दिंडीत गाडी घुसवली असता दोन महिला जागीच ठार तर दोन महिला गंभीर अवस्थेत होत्या त्यांचे ही निधन झाले . तर दिंडीतील लोक बावीस गंभीर अवस्थेत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष टाकून भरधाव पिकप वाहनाने वारकरी संप्रदाय यांना चिरडलेल्या चार मृत्यू झालेल्या महिलांना न्याय देऊन देवाची आळंदी व इतर यात्रा पायी जाणाऱ्या दिंडी सोहळ्यात सुरक्षिततेची व्यवस्था करावी.





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

कार्तिक एकादशी निमित्त उंबरे येथून निघालेल्या ह भ प श्री  येरम बुवा यांच्या देवाची आळंदी दिंडी ला आज सकाळी पुणे हवेवर वडगाव मावळ या हद्दीत  काना फाटा येथे मंदधुंद असलेल्या पिकप चा ड्रायव्हर ने वारकरी महिला चालणाऱ्या अंगावरती गाडी घातली असता मेंढरासारखे अवस्था करून ठेवले यामध्ये जयश्री पवार व सविता येरम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी होत्या सुरेखा चोरगे बीड व संगीता शिंदे सालोक अखेरची झुंज देत प्राणज्योत सोडले यात 22 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे मावळ पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत पिकप चालकाला अटक केली असून जखमींवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.


कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय आळंदी दिंडीला पाई पदयात्रा करत असतात या रस्त्याला शासनाने पोलीस बंदोबस्त देऊन येणा जाणाऱ्या गाड्या कोण दारूच्या नशेत गाडी चालवत असतो तर कोणी घाईगडबडीत असतो वारकरी संप्रदाय हे भगवंताचे नामस्मरण करून आळंदी येथे पायी दिंडी ला जात असतात तर वारकरी संप्रदाय यांच्याकडे जातीने लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने पोलीस यंत्रणेला सांगून यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे नाहीतर याच्या पुढे असे किती जीव गमवावे लागतील सांगू शकत नाही

Post a Comment

Previous Post Next Post