निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा होणार मेळावा.

 म्हसल्यात कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार येणार .





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा होणार मेळावा.राज्यातील जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्ष जिल्हा तालुका गट गण पातळीवर कार्यकर्त्यांचे मेळावे सभा व बैठकांचे आयोजन करत असतानाच म्हसळा तालुका काँग्रेस आय तर्फे राज्याचे मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती कल्याण खार जमिनी विकास भूकंप पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता स्टेट बँकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस तालुका सरचिटणीस रवींद्र दळवी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र धरत आणि जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित रहाणार असल्याचे दळवी यानी म्हटले आहे.

"तालुक्यात नगरपंचायत,बहुतांश ग्रामपंचा यती,पंचायत समिती आणि जिल्हापरिषद राष्ट्रवादी काँग्रेसची निर्वीवाद एकहाती सत्ता असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, शेकापक्ष या अन्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते याना तालुका प्रशासकीय पातळीवर काडीचीही किंमत नसल्याची खंत बहुतांश कार्यकर्त्यांच्यात आहे त्यामुळे भविष्यातील स्थानिक निवडणुकांत आघाडी-युतीबाबत वरीष्ठ काय निर्णय देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष रहाणार आहे"

Post a Comment

Previous Post Next Post