महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू राज्य सरकारने काढली नवीन नियमावली.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.
गेल्या काही दिवसापासून वाढणाऱ्या कोविंड रुग्णसंख्या मुले पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाला आहे यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट मुळे चिंता वाढली आहे.
केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या सोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम या ठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
काय आहे नियमावली?
रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.
महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक टॅक्सी किंवा खाजगी मास्क न घातल्यास पाचशे रुपये दंड तसेच वाहन मालका सही पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल किमान सहा फूट अंतर राहील असं सोशल डिस्टिक का पालन करावं सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सक्त मनाई आहे
केंद्राचा सर्व राज्यांना पत्र
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोर नाच्या नव्या व्हेरी एन्ट मुले खबरदारी घेण्यात येत आहे केंद्र सरकारने पत्र लिहून राज्यांना आदेश दिलेत की सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा दक्षिण आफ्रिका होंग कोंग आणि बोस्थवानायेथुन येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश रोशन यांनी राज यांना पत्र दिले