आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करुन नामस्मरण जागरण करुन आनंदोत्सव साजरा करतात
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करून तसेच कुलदेव बोर्ले गावचे नवं दिवस ग्रामस्थ एकत्र येऊन नवरात्र उत्सव कुळ देवाचे कार्यक्रम रोज सकाळी व संध्याकाळी आरती व जागर भजन नित्य नेमाने आरती भजन करत असतात वडील धारी माणसे तसेच महिला बंधू भगिनी गावातील तरुण तडफदार मुले आपली उपस्थिती दाखवीत असतात .बोर्ले गावाची शानच भारी गावकीने गावाची सभा घेऊन हनुमान मंदिरात सर्व निर्णय घेण्यात येत असतात
बोर्ले गावातील सर्व ग्राम स्थाना कळविण्यात आले होते की कुलदैवत जेजुरीला घेऊन जाण्याकरिता गुरुवार दिनांक 11 11 2021रोजी बोर्ले येतील हनुमान मंदिरात 8 30 वाजता सभा घेण्यात आली होती व सभेत ग्रामस्थ उपस्तीत होते त्या ठरल्याप्रमाणे आज 21 11 2021 रोजी सकाळी ठरल्याप्रमाणे कुळ देवांची आरती करून हनुमान मंदिरात ग्रामस्थ नि आरती करून जेजुरीला बोर्ले गावचे कुलदेव घेऊन अभिषेक करायला कुलदैवत खंडोबा च्या दर्शनाला मोठया संख्येने ग्रामस्थ निगाले. रविवारी जेजुरी ला वस्ती करून पहाटे पाच वाजता जेजुरी गडावर जेजुरी गडाचे मुख्य दरवाजे च्या पायथ्याशी बोरले ग्रामस्थांनी हजेरी उपस्थिती लावली आस्था पहाटेचा सायरन गडावर झाल्यानंतर दरवाजे उघडण्यात आले बोरले ग्रामस्थाने प्रवेश आत मध्ये केल्यानंतर येलकोट येलकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं चांगभलं जोरजोरात गर्जना देत आत मध्ये प्रवेश केला कुलदैवताची सकाळची आरती करून अभिषेक घालण्यात आला कुलदैवत खंडोबा रायाला पाच प्रदक्षिणा घालून ग्रामस्थांनी नतमस्तक होऊन प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करून परतीच्या मार्गाला सर्व ग्रामस्थ निघाले सोमवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान बोरले येथे सुखरूप पोहोचला असता गावातील ग्रामस्थ कुलदैवतांच्या स्वागताला आतुरतेने वाट पाहत होते बॅन्जो यांच्या उपस्थितीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीने गावातून वाजत गाजत नाचत कुलदैवतांचे जोरदार स्वागत करण्यात आले गावातील कुलदैवतांच्या मंदिरासमोर फटाके वाजवून कुलदैव देव्हार्यात स्थानापन्न करून देवाची आरती करून सांगता समारोप करण्यात आला
कुलदैवत खंडोबा
मल्हारी मार्तंड भैरवांचे प्रसिद्ध स्थान म्हणजे जेजुरीचा खंडोबा. महाराष्ट्रात खंडोबा हे चातुवर्ण्याचे कुलदैवत आहे. ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य, दलित ह्या सर्वसमाजात आपल्याला खंडोबा कुलस्वामी व तुळजाभवानी कुलस्वामिनी पहावयास मिळते.
उपासना- मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सहा दिवस कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाच्या टाक/ मुर्ती स्वच्छकरुन त्यांची स्थापना करुन देवी नवरात्री प्रमाणे सहा दिवस माळ बांधतात. सहा दिवस घरातील मुख्य व्यक्ति उपवास करतात. मल्हारी महाम्य ग्रंथाचे वाचन करतात. सहावा दिवस, चंपा षष्ठीला देवांना अभिषेक करुन पूजापाठ झाल्यावर दिवटी कंदलीसह पंचारती होते; त्यानंतर पुरण वरणाचा नैवेद्य दाखवून हळद व खोबर घेऊन तळी भरतात व देवाचे नामस्मरण करतात. ’येळकोट येळकोट जय मल्हार“ सदानंदाचा येळकोट. खंडोबाच्या नावाने चांगभल विचारपूस सर्वांच चांगल व्हाव अशा अर्थाने आलेला आहे.जय घोषानंतर हरिद्राचुर्णात मढलेल्या सुक्या खोब-याचा प्रसाद वाटला जातो. अशाप्रकारे देवाची उपासना करावी.
चैत्र पौर्णिमा, आषाढ शुद्ध प्रतिपदा, चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, महाशिवरात्र, सोमवती अमावस्या ह्या दिवशी खंडोबाच्या यात्रा भरतात व उपासना करणा-या सर्व उपासकांनी हया दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करुन नामस्मरण जागरण करुन आनंदोत्सव साजरा करतात.