प्रेस मीडिया वृत्तपत्र
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या एपीएम टर्मिनल्स मुंबईने नवीन साप्ताहिक आंतर-आशिया सेवा कार्यान्वित केली आहे. आरडब्ल्यूए१ (आरसीएल फीडर्स चायना-वेस्टर्न इंडिया सर्व्हिस) या नावाने ओळखली जाणारी सेवा आरसीएल फीडर्स, पॅसिफिक इंटरनॅशनल लाईन्स, सीयू लाईन्स आणि इंटर एशिया लाईन्स यांच्यातर्फे आरसीएल फीडर्सच्या बरोबर ३५ दिवसांच्या चक्रात ५ व्हेसल्सचा वापर करून संयुक्तपणे कार्यरत आहे. मुंबईमधील टर्मिनलवर १५ नोव्हेंबर रोजी या सेवेतील पहिला मेडन कॉल आला. या साखळीत नान्शा, शेकोऊ, सिंगापूर, वेस्टपोर्ट, नॉर्थपोर्ट, न्हावाशेवा, मुंद्रा, वेस्टपोर्ट, हेफोंग, नान्शा या बंदरांचा समावेश आहे.
या नवीन कॉल बद्दल बोलताना जीटीआयचे सीओओ गिरीश अगरवाल म्हणाले, “जीटीआय नेहमीच ग्राहक सेवेसाठी अग्रणी राहिली आहे आणि आमच्या बंदराला आशियाशी जोडणाऱ्या सेवेचा एक भाग असल्याबद्दल आम्हांला खूप आनंद होत आहे. या सेवेमुळे आमच्या ग्राहकांना त्यांची बाजारपेठ विस्तारण्याची आणि आजवर न पोहोचलेल्या आशियाई देशांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. आमच्या पायाभूत सुविधा आणि