मानवी स्वास्थ्याला घातक असणारा या कारखान्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रदूषणकारी एसएमएस कारखाना मुंबईतून खालापुरात आत्करगाव येथे येणार आहे. मानवी स्वास्थ्याला घातक असणारा कारखाना साजगांव पंचक्रोशीत नकोच या मागणीसाठी सुरुवाती पासूनच ग्रामस्थ विरोध करतायेत आणि शेवटच्या श्वासापर्यँत विरोध करू असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला असून याबाबत ग्रामस्थांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी 17 ऑक्टोंबर ला सॅम्युअल मॉल येथे झालेल्या जणसुनावणीच्या दरम्यान नागरिकांनी घोषणाबाजी करून निषेध करीत आमचा नागरिकांनी सुरुवातीलाच कामकाजाला विरोध दर्शविल्याने जवळपास तासभर घोषणाबाजी करीत कामकाज थांबविले आणि त्यानंतर नागरिकांच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या वतीने म्हणणं मांडण्याची संधी दिली, यात सदरचा कारखाना हा नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचविणारा आहे त्यामुळे या कारखान्याला परवानगी देऊ नये अशी मागणी करीत सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी लोकप्रतिनिधी प्रभावी पणे बाजू मांडून कडकडून विरोध दर्शविला.
एसएमएस कारखान्याच्या जागेपासून २०० मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड,कुंभेवाडी, आत्करगांव वाडी, बौध्दवाडा, जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचऱ्यामुळे हवा दुषित होवून दुर्गधी पसरले तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होवून नदीवरील पाणी योजना दुषित हो साथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच दि.13 आँगस्ट रोजीची जनसुनाणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला, परंतु पुन्हा दि.17 नोव्हेंबर जनसुनावणी जाहिर झाल्यानंतर 5O स्थानिक ग्रामस्थांनी खा.सुनिल तटकरे, आम.जयंत पाटील यांच्या समक्ष भेट घेवून सदर घटनाक्रम सांगितल्यावर जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांनीही निवेदन दिले आहे.
या कारखान्याच्या बाबत नागरिकांचे म्हणणे ऐकुन घेण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे, प्रदूषण मंडळ अधिकारी किल्लेदार, तहसिलदार आयुब तांबोळी यासह अन्य अधिकारी तसेच नागरिकांच्या वतीने भाई शिंदे, अंकित साखरे, एकनाथ पिंगळे, समीर देशमुख, संदीप पाटील, राम देशमुख, काशीनाथ पाटील, चंद्रकात देशमुख, किशोर पानसरे, सुनील पाटील, नरेश गायकवाड, सुनील सुखदरे ,मनीष खवळे आदिनी प्रभावीपणे बाजू मांडून होऊ पाहणाऱ्या कंपनीला विरोध दर्शविला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती बैनाडे यांनी आपण आपली बाजू मांडावी अशी सूचना करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल अशी सूचना केली.