पनवेल तालुका तुराडे गाव येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता



प्रेस मेडिया वृत्तपत्र

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुराडे येथून सतरा वर्षे तीन महिने वयातील खुशी धर्मेंद्रप्रसाद पांडे हि घरातून बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील धर्मेंद्रप्रसाद चंद्रशेखर पांडे,मु.तुराडे,मुळचा बैरगाघ,ता-अमेठी, उत्तरप्रदेश यांनी रसायनी पोलिस ठाण्यात दिली आहे.अल्पवयीन मुलगी खुशी धर्मेंद्रप्रसाद पांडे हिच्या अज्ञातपनाचा फायदा घेऊन तिला 23/10/2021 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून कोठेतरी पळवून नेले असून खुशीची उंची चार फुट पाच इंच आहे,तिचा चेहरा गोळ,डोळे काळे, हातात हिरव्या रंगाचे कडे, अंगात काळ्या रंगाचा टाॅप, निळ्या रंगाची जिन्स पॅट,पायात चप्पल अशा वर्णन आहे.

याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात 154/2021 भादंवि.कलम 363 अन्वये गुन्हा दाखल झाला असून याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.

अशा वर्णंनाची मुलगी कोणास आढळल्यास रसायनी पोलिस ठाणे फोन-02192-250133 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.



जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

Post a Comment

Previous Post Next Post