दिवाळी अंकांच्या मांदियाळीत वेगळेपण जपणारा सिटी बेलचा दिवाळी विशेषांक- लोकनेते रामशेठ ठाकूर



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड आणि नवी मुंबई येथील अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्र 'सिटी बेल' दिवाळी विशेषांक प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दिवाळी अंकांच्या मांदियाळीत वेगळेपण जपणारा असा सिटी बेलचा दिवाळी विशेषांक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

     अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा दिवाळी विशेषांक हा " एक्सप्लोर द वर्ल्ड " या थीमवर आधारित आहे.या विशेषांकाचे प्रकाशन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत पनवेल झपाट्याने बदलत आहे.आज पनवेल नगरपरिषदेची महानगरपालिका झाली, तसेच उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे पनवेल देशभरात प्रसिद्ध झाले आहे.येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जा वरती चमकणार आहोत.हे सगळे होत असताना येथे अमराठी भाषकांचा टक्का देखील वधारतो आहे.सिटी बेल वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना  येथील स्थानिक घडामोडी समजण्यास मदत होईल.

  

 

  लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिटी बेल च्या पर्यटन विशेषांकाचे तोंड भरून कौतुक केले.समूह संपादक मंदार दोंदे आणि समूह संपादक विवेक पाटील यांच्या संकलन कौशल्याची प्रशंसा देखील केली.या संपादक द्वईंच्या कन्या देखील सिटी बेलच्या माध्यमातून पत्रकारितेत पदार्पण करत असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.सजावट तसेच रंगासंगती देखील अप्रतिम झाली असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.या प्रकाशन सोहळ्याचे समयी पनवेल महानगरपालिकेच्यानगरसेविका दर्शना भोईर, भाजपाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post