प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्पोर्ट्स अॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ ठरवत त्याने सुवर्णपदक जिंकले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान असलेला रूपेश पनवेल तालुक्यातील नितळस गावचा असून चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहे. या कामगिरीबद्दल पैलवान रूपेशची हरियाणातील सोनिपत येथे 6 ते 8 जानेवारी 2021 या कालावधीत होणार्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.