लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
चंद्रपूर शहरात गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरी चा प्रमाण वाढले आहे दुचाकी चोरीच्या या टोळीला पकडण्यासाठी जेव्हा स्थानिक पोलिसांनी जाले टाकले तेव्हा या टोळीत राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेल्या युवतीचा ही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
स्थानिक माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे समोर येताच पोलिसांनी चोरांचा तपास करण्यास सुरुवात केली या तपासात अशी माहिती हाती आली की,'एक व्यक्ती दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत आहे. गाडीच्या निम्या किंमतीला ही गाडी विकण्यात येणार आहे.यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत सापळा रचला यात वाहनचोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं आणि चक्क या टोळीमध्ये राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेल्या युवतीचाही समावेश असल्याचं आढळून आलं आहे. या टोळीने आतापर्यंत 19 दुचाकी चोरल्या असलयाचे तपासात समोर आलं आहे. लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती.