संविधान स्तंभाला अभिवादन करून सामूहिक प्रस्तावना वाचनाचा शिरूर येथे कार्यक्रम संपन्न




प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख :

पुणे :  दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोझ भाई सय्यद यांनी संविधान दिनानिमित्त राज्य शासनाच्या माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत शिरूर शहरातील भारत सरकार द्वारे 1972 साली देशाच्या स्वातंत्र्याच्या 25 वर्षे पूर्ण होण्याप्रीत्यर्थ स्थापित संविधान स्तंभाला अभिवादन करून सामूहिक प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय प्रचारक माननीय कुमार काळे सर यांच्या हस्ते संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाला इंडीयन मेडिकल प्रोफेशन असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे सर,प्रोटॉनचे राज्य सचिव मा.  प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ कांबळे सर, भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष समाधान लोंढे, लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक मंगेश खांडरे,विनोद भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संतोष शितोळे, भारतीय जनता पार्टी शिरूर व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे,आम आदमी पार्टी चे अनिल डांगे, मुस्लिम जमातचे खजिनदार शाबिरभाई शेख, डॉ. अतुलकुमार बेंद्रे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील माळवे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल चे तालुकाध्यक्ष युवराज सोनार, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल तात्या बांडे, आयेशा बेगम उर्दू हायस्कूल चेअरमन पटेल सर, जनहित कक्ष शिरूर चे रवी लेंडे,बहुजन क्रांती मोर्चा चे श्रीकांत चाबुकस्वार सर, लहुजी क्रांती सेने चे विशाल जोगदंड, उद्योजक योगेश जामदार, शिरुर एसटी डेपो चे अनेक कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर सारंगधर, सिराज भाई शेख, नादीरभाई शाह, शाबानभाई शाह, श्याम झेंडे, विजय भोइरकर,बबन दादा गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे शशिकला लोंढे मॅडम, वैशाली कांबळे मॅडम तसेच जिवन विद्या मंदिर चे विद्यार्थी व शिरूर शहरातील  पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post