लोक जनशक्ती पार्टी रामविलास सर्व जागा स्वबळावर लढवणार
लोक जनशक्ती पार्टी रामविलास या राष्ट्रीय पक्षांचा 21 वा वर्धापन दिन साजरा
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : रविवार दि.28 नोव्हेंबर रोजी लोक जनशक्ती पार्टी रामविलास या राष्ट्रीय पक्षांचा 21 वा वर्धापन दिन पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या वतीने पुणे शहर जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला, 28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली*
या वेळी पुणे शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षात जाहीर प्रवेश केला व युवा आयडाॅल म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.चिरागजी पासवान यांच्या विचारधारेवर चालत पक्षाचा प्रसार व प्रचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी काम करण्याचे वचन दिले.
*सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणारे महाराष्ट्र प्रदेश सचीव सुप्रसिद्ध गायक अमर पुणेकर यांनी देशभक्तीपर गीत सादर केले व उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यामधे उत्साहाचे वातावरण तयार झाले*.
*सदर प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी गेल्या चार वर्षांपासून केलेल्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. येणा-या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास )राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.चिरागजी पासवान यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा शमीमभाई हवा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले*.
*शिरूर तालुक्यात लोक जनशक्ती पार्टीचे काम चांगले असल्याने जनतेच्या आशीर्वादाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत लोक जनशक्ती पार्टी चे उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन शिरूर तालुका अध्यक्ष शरद टेमगिरे यांनी दिले*.
*आ. सुमेध बोधी, के.सी.पवार ( पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस),पुणे जिल्हा सचिव कन्हैया पाटोळे, महीला आघाडी च्या सरचिटणीस कल्पना जगताप यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले*
*सदर कार्यक्रमास,सिनेअभिनेत्री नेहा दोरके, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष पिल्ले, सल्लागार विनोद धिवार, पुणे शहर उपाध्यक्ष संजय चव्हाण, पुणे शहर संघटक मिलींद राजगुरू, हवेली तालुका अध्यक्ष राजू कु-हाडे, शिरूर तालुका उपाध्यक्ष संतोष वायदंडे,रंजीत सोनावळे, नेपथ्यकार सचीन फुलपगार, पुणे शहर युवक आघाडी उपाध्यक्ष राहूल कुलकर्णी, युवक आघाडी सरचिटणीस आदिनाथ भाकरे,वडगाव शेरी उपाध्यक्ष आतिष सोनवणे, राजेश साळवे, राजेश पिवाल, योगीता साळवे, निर्मला त्रिभुवन, कुसूम दहीरे, अप्पा पाटील,बंडू वाघमारे, गणेश भोसले, राहूल उभे, राहूल शेळके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*
*संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर संघटक बुद्धभूषण यांनी केले.व उपस्थित पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले*.