मारेकरी पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुण्यातील कात्रज परिसरात व्याजाच्या पैशातून झालेल्या भांडणातून तरुणाचा खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. खून केल्यानंतर मारेकरी पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, शरद आवारे हा लोन करून देण्याची कामे करत होता. दरम्यान व्याजाचे पैसे देण्यावरून त्याचे दोघांशी भांडण झाले होते. याच भांडणाच्या रागातून दोघांनी त्याला रविवारी मध्यरात्री कात्रज-नवले रस्त्यावरील आंबेगाव परिसरात गाठले. त्यानंतर धारधार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार करून खून केला. काही वेळा नंतर माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. खून करणाऱ्या दोघा संशयितांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे