सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी ११ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे

देशातील प्रशासकीय सेवांमध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यासक्रमाची सुरवात केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या आवारात चालणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण आणि पदवीच्या वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व ऑफलाईन अशा ब्लेंडेड पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्‍ट्ये ः

  • सहा सत्रांमध्ये अभ्यासक्रम शिकविला जाणार

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांवर आधारित अभ्यासक्रम

  • लेखन, संभाषणकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण आदींवर भर

  • चाचणी परीक्षांचे आयोजन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पात्रता ः राज्यातील कोणत्याही महाविद्यालयाचा पदवीचा विद्यार्थी. शिक्षणचालू असतानाही केंद्रात प्रवेश मिळतो.

प्रवेश क्षमता ः ६०

महत्त्वाच्या तारखा ः १) अंतिम प्रवेश यादी ः १५ डिसेंबर

२) प्रत्यक्ष प्रवेश ः १६ ते २० डिसेंबर

३) शिकवणीला सुरवात ः २७ डिसेंबर

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ ः 

https://forms.gle/MwaGPhjSU5JjnG8WA





Post a Comment

Previous Post Next Post