महामार्गावरील जड व अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजे पर्यंत बंद रहाणार

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पुणे - कामशेत येथील अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर महामार्गावरील जड व अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजे पर्यंत बंद रहाणार आहे. हा निर्णय संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा पार पडे पर्यंत असणार आहे.घुसल्याने चार वारकरी महिलांचा मृत्यू झाला. तर 23 महिला जखमी झाल्या. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेतजवळील सातेगावच्या हद्दीत पहाटे घडली. तर दुसरीकडे पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावाच्या हद्दीमध्ये अज्ञात वाहनाने पाच जणांना उडवले. या मध्ये एका महिलेसह दोन लहान मुले ठार झाली. या दोन्ही घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख आणि पोलीस अधिक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त आळंदी येथील माऊली मंदिरात भजन, किर्तन व जागरणाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. हे कार्यक्रम 26 नोव्हेंबरला सुरु झाले असून 3 डिसेंबर पर्यंत सुरु रहाणार आहेत. यानिमीत्त राज्यभरातून पायी दिंडी आळंदीत दाखल होत आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या आळंदीकडे मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरुन पायी दिंडी येत आहेत. सुरक्षेच्या दुष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. — डॉ.अभिनव देशमुख (पोलीस अधिक्षक)

Post a Comment

Previous Post Next Post