नवाब मलिक यांच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डावर (ईडीने) छापे टाकले


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख  :

पुणे - मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत.आज सकाळपासून ही कारवाई सुरू असून या मध्ये वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. पुण्याबरोबर आौरंगाबदमध्येही ही छापेमारी सुरू असून नेमके कोणत्या ठिकामी हे छापे मारण्यात आले आहेत, याविषयी माहिती मिळालेली नाही.

वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयाअंतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मिलक यांच्याकडे हे मंत्रालय आहे. बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छापेमारीला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी ईडीने पुण्यात या प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आॅगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. अटक केलेल्या अधिकाऱ्यांवर पदावर असताना ७.७६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आता ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे.

औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारण्याची कारवाईसुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु असून लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाईल. शहरातील विविध सात स्थळांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यात नक्षत्रवाडी परिसराचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहिती प्राथमिक स्तरावर हाती आली आहे. मात्र कोणत्या दोन उद्योजकांविरोधात ही कारवाई सुरु आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post