नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात प्रादेशिक परिवहन यांचे आवाहन.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि,२८ रिक्शा मीटर कॅलीब्रेशन पुर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे .प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने अहवान करण्यात आले आहे,
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे कार्यक्षेत्रातील मीटर कॅलीब्रेशन झालेल्या ऑटोरिक्षांची मीटर तपासणी करणे करिता विकेंद्रीकरण करण्यात आलेल्या ट्रॅकच्या ठिकाणांमध्ये अंशत बदल करण्यात आल्याबाबत . प्रादेशिक परिवहन प्राधिकरण , पुणे ( पुणे , पिंपरी - चिंचवड व बारामती ) यांनी मा . खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता दिनांक २२.११.२०२१ पासून भाडेवाढ लागू केलेली आहे . नमुद भाडेदर दिनांक २२.११.२०२१ पासून लागू झालेले असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण ( Meter Calibration ) करणेकरिता दिनांक २२.११.२०२१ पासून ३१.०१.२०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे . ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण ( Meter Calibration ) विहित कालमर्यादेत व सुरळीत पणे पुर्ण होण्याकरिता मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे . या अनुषंगाने पूर्वी निश्चित केलेल्या ट्रॅकच्या ठिकाणांमध्ये अंशतः बदल करून पुढीलप्रमाणे ट्रॅकची सुधारित ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत .
मीटर तपासणी केंद्रे
१. *अलंकार पोलीस स्टेशनसमोर कर्वेनगर*
२. *फुलेनगर , आळंदी रस्ता चाचणी मैदान*
३. *रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट , इगलबर्ग कंपनी , लेन नं.३४. *दिवे ( पासिंग वाहने )*
५. *इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर* ,
खराडी उपरोक्त मीटर तपासणी ट्रॅकवर रविवार , दिनांक २८.११.२०२१ पासून सकाळी ०७.०० ते सकाळी १०.०० या वेळेमध्ये ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार आहे . तरी उपरोक्त सुविधेचा रिक्षाचालकांनी कॅलीब्रेशन पुर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे .
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क अन्वरअली 9975071717*