देहूरोड शहरातील सर्व पक्ष संघटना संस्थाचे प्रमुख एकत्रित येऊन

 भारतीय नागरिक देहूरोड शहराच्या वतीने काढण्यात आलेला भारतीय संविधान भव्य दिव्य रॅली संपन्न .

प्रेस मीडीय वृत्तसेवा : अन्वरअली शेख :

देहूरोड शहरात आज सकाळी १०:३० वाजता संविधान दिवस साजरा करण्यात आला.

*नयन मनोहर एकता अखंडता समता बंधुता दाखविणारे  हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, वेशभूषा परिधान करून छोटे भावी नागरिक आणि रथाच्या मागे पुढे हजारो भारतीय नागरिक भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधान आमच्या "स्वास आणि घास", "बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो", "हम सब एक है", "भारतीय संविधानाचा, विजय असो", आदि घोषणेने देहूरोड शहरात काढण्यात आलेल्या भव्य दिव्य भारतीय संविधान रॅलीने संपूर्ण देहूरोड शहर दुमदुमून गेले.

देहूरोड सर्व पक्षीय पक्ष सामाजिक संघटना संस्थेचे प्रमुख व त्यांचे सहकाऱ्यांच्या सह भारतीय महिला पुरुष शालेय विद्यार्थी भारतीय संविधान रॅली मध्ये सहभागाने संपूर्ण देहूरोड शहर फुलून  होते   .       

देहूरोड  :- देहूरोड शहरातील सर्व पक्ष संघटना संस्थाचे प्रमुख एकत्रित येऊन भारतीय नागरिक देहूरोड शहराच्या वतीने काढण्यात आलेला भारतीय संविधान भव्य दिव्य रॅली संपन्न झाला

 भारतीय संविधान दिना निमित्त प्रारंभी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयातील दर्शनी भागात भारतीय संविधान शिल्पाला कार्यक्रमाचे संकल्पकार ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी पुष्प अर्पण केले  मानव अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी , ह्युमन राईट्स जस्टिस असोशियन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर  यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे देहूरोड शहराध्यक्ष विजय पवार यांनी भारतीय संविधान प्रास्ताविक चे पठण केले. उपस्थितांनी संविधान संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली  तर सूत्र संचालन चंद्रशेखर पात्रे यांनी केले आभार  विजय लोंढे यांनी मानले या कार्यक्रमाचे संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष रज्जाक शेख व देहूरोड शहराचे पदाधिकाऱ्यांनी केले.                        

 सकाळी ११.०० वा.दरम्यान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पा शेजारी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाम फलकास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॶॅड.कैलाश पानसरे  कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल नाईकनवरे राजाराम अस्वरे (दादा) यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून  भारतीय संविधान रॅलीला प्रारंभ झाला रॅलीच्या रथात विविधतेतुन एकता हा सजीव देखावा केला होता, १० वर्षाच्या वयाच्या दरम्यान हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध असे वेशभूषा परिधान करून सुटा बुटात थाटामटात भारतीय संविधान हातात घेऊन छोटा बालक डॉ बाबासाहेब आंबेडकर वेशभूषा करून असा लहान मुलांचा एकता अखंडता सजीव देखावा केला होता.

 रथाच्या पुढे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे शासकीय प्रशासक ॷॅड कैलास पानसरे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, ह्युमन राईट्स जस्टिस असोशियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, कार्यक्रमाचे अन्नदाते, आधारस्तंभ प्रभाकर निकम, मदद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अन्वरअली शेख, कार्याध्यक्ष घौस सुनार, सोहेल बेपारी,फरत आत्तार, व अध्यक्ष अब्बास शेख, मौलाना जावेद शेख (मक्का मस्जिद)विकास नगर व इतर या वेळी उपस्थित होते, तसेच देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॶॅड कृष्णा दाभाळे, महिला अध्यक्ष शीतलताई हगवणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट घ्या माजी उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे  राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण विभाग चे अध्यक्ष शिवकुमार मुर्रगन ऊर्फ बल्ली, रिपब्लिकन पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष सुनील गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे पक्ष नेते श्रीमंत शिवशरण, अशोक चव्हाण, इंद्रपाल सिंग रतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना जेष्ठ नेते रमेश जाधव, भीम ज्योत बहुउद्देशीय संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितराव  किर्ते, महासचिव सुरेंद्र जाधव, विजय बी. शिंदे, आरपीआय नेते सिद्धार्थ चव्हाण,  राष्ट्रवादी महिला काँग्रेस दक्षिण भारतीय मावळ तालुका शहराध्यक्षा हेमा रेड्डी, अर्चना कोळी,  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जावेद शेख ,आनंद साळवी, देहूरोड शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जावेद भाई शकीलकर, कांग्रेस आय. कार्याध्यक्ष दीपक चौगुले, सामाजिक कार्यकर्ते हिरामण साळुंके, ज्येष्ठ नेते कांग्रेस व्यंकटेश कोळी, मानव आधार सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ शेट्टी राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेटकर, देहूरोड शहराध्यक्ष संतोष उर्फ सनी दूधघागरे , पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी, देहूरोड शहराध्यक्ष देवा स्वामी,बुद्धविहार ट्रस्टचे सचिव अशोक रुपवते,वंचित आघाडी चे नेते सुरेश भालेराव, बूद्धिष्ट इंटरनॅशनल चे उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब धावारे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने महिला पुरुष , पोलीस मित्र मंडळाचे महिला पुरुष  विशेष पोलीस अधिकारी देहू येथील जगदंबा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी ,भीम ज्योत संघटनेचे महिला कार्यकर्त्या भारतीय भव्य दिव्य संविधान रॅलीत सहभागी होते. रॅलित भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय सविधान आमचा श्वास आणि घास, हम सब, एक है अशा गगनभेदी घोषणा देत भारतीय संविधान रॅली मुंबई-पुणे मार्गाने सवाना हॉटेल चौक ,तेथून अभिविला चौक,  मार्गे , पुन्हा सर्वांना  चौकातून आबुशेठ रोड वरून वृंदावन चौक, महात्मा फुले मंडई, देहूरोड बाजारपेठेतुन ऐतिहासिक नेताजी सुभाष चंद्र बोस चौकातील शिव स्मारकातील  श्री छत्रपती शिवाजी महाराज, यांना युवा नेते   अमोल नाईकनवरे  रिपब्लिकन पक्ष नेते श्रीमंत शिवशरण यांनी पुष्पमाला अर्पण केले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस बाबुच्या पुतळ्यास सामाजिक नेते प्रभाकर निकम चंद्रशेखर पात्रे यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल  यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.               

  पार्शीचाळ येथे  म.न.से

 देहूरोड शहर,म.न.से वहातुक  सेनेचे नेते जाॅर्ज दास , मोझेस दास तर ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात  रिपब्लिकन पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष सुनिल गायकवाड यांनी स्वागत केले.        उड्डाणपुलाखाली भारतीय संविधान रॅलीचे अभिवादन कार्यक्रमात रूपांतर झाले.     भारतीय संविधान देशाची विविधतेतून एकता अखंडता टिकवणारे सर्वांना समान सामाजिक न्याय देणारी संविधान आहे. त्यांचे संवर्धन आणि रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  ते प्रत्येक भारतीयांनी केले पाहिजे अशी अपेक्षा देहूरोड  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी केले. कार्यक्रमात प्रारंभी के. एच. सूर्यवंशी यांनी संविधान प्रास्ताविकाचे पठण केले.  या वेळी संविधान संरक्षण आणि संवर्धनाची उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली.

 कार्यक्रमाचे संयोजन अमोल नाईकनवरे राजारामा अस्वरे यांनी रामस्वरूप हरितवाल यांच्या पुष्पगुच्छ  प्रदान करून सन्मानित केले. तर मानव आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी राज्य उपाध्यक्ष बाबू हिरेमेटकर देहुरोड शहराध्यक्ष,संतोष ऊर्फ सन्नी  दूधघागरे यांनी रामस्वरुप हरितवाल यांना अशोक स्तंभ प्रदान करून सन्मान केला.     भारतीय संविधान महा रॅलीचे व सांगता  कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन के एच सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, चंद्रशेखर पात्रे यांनी केले. या भव्य दिव्य भारतीय संविधान  रॅलीचे संयोजन के.एच.सुर्यवंशी, अमोल नाईकनवरे, अशोक कांबळे, प्रभाकर निकम, चंद्रशेखर पात्रे, राजाराम अस्वरे, धर्मपाल कांबळे, तुळशीराम गायकवाड, प्रकाश कांबळे, संजय शेंडे, चंद्रभान गायकवाड विजय लोंढे, अशोक गायकवाड ( किन्हई) यांनी संपन्न केला शेवटी भारतीय राष्ट्रगीताने भारतीय संविधान महा रॅली कार्यक्रमाची सांगता झाली. तनपुरे फाॅऊडेशनचे महिला, पुरूष व विशेष अधिकारी यांनी ही शहर वाहतुक नियंत्रणाचे उत्कृष्ट पणे पार पाडली.                         



*बातमी व जाहीराती साठी संपर्क अन्वरअली, 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post