प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पोलिस दलाच्या पोर्टलवर पुण्यातील ३२ पोलिस ठाण्याअंतर्गत तब्बल २८७ तक्रारींचा निपटारा झालेला नाही. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे व वाढत राहणार पुणे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास आहे.म्हणून ई तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहे.नागरिकांना येणाऱ्या अडचणी अगर तक्रारी घरबसल्या देता याव्यात यासाठी शासनाने पोलिस दलाचे स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.
पुणे शहरात सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांनी दाखल केलेल्या ऑनलाइन (ई-तक्रारी) तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाणे दरबारी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाणेप्रमुख व सीसीटीएनएस नोडल अधिकारी यांना संबंधित तक्रारींची तत्काळ निर्गती करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील ३२ पोलिस ठाणे अंतर्गत तब्बल २८७ (ई-तक्रारी) प्रलंबित आहेत. त्यातील वारजे माळवाडी, सिंहगड रोड, दत्तवाडी, चंदननगर, चतुःशृंगी, येरवडा, हडपसर, वानवडी, कोंढवा या पोलिस ठाण्यात सर्वाधिक ई-तक्रारी प्रलंबित आहेत. काही ठाण्यांत प्रलंबित तक्रारींची संख्या शून्य आहे.
परंतु मागील काही दिवसांपासून दाखल झालेल्या तक्रारींची निर्गती होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रलंबित ई-तक्रारीवर योग्य ती कारवाई करून त्या तत्काळ निर्गती करून अहवाल मुख्य कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. या पूर्वीदेखील वारंवार नोटीस व ब्रॉडकास्टद्वारे तक्रारीची निर्गती करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ठाणे उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सीसीटीएनएस नोडल अधिकारी यांना स्वतः लक्ष देऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.