प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी गफूर भाई शेख यांची पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मा.जमिर काझी साहेब तसेच पुणे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष मा.चंद्रकांत गोरे पाटील ,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन फेरनिवड करण्यात आली,व देहूरोड शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी मेहबूब अब्दुल रहेमान गोलंदाज यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा . हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले होते,त्या वेळी मदद फाउंडेशन देहूरोड या सामाजिक संघटनेचे कौरकमेटी चे सर्व पद अधिकारी उपस्थित होते, मदद फाउंडेशन देहूरोड च्या वतीने मा. गफूरभाई शेख व मेहबूब गोलनदाज यांचं जंगी स्वागत करण्यात आले,
यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा. हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, व कार्याध्यक्ष दीपक सायसर यांनी सूत्र संचालन केले.
पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मा. जमिर काझी साहेब म्हणाले की , मला विश्वास आहे की मावळात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी गफूरभाई शेख काम करतील, माजी पोलिस उप निरीक्षक अबू बकर लांडगे साहेब म्हणाले गफूरभाई हे काँगेसचे एवढे निष्ठवन्त कार्यकर्ते आहे की ते झोपेत सुध्दा काँग्रेस पक्षाचेच काम करतात,व देहूरोड शहरातील अल्पसंख्याक समाज त्यांच्याशी आपार प्रेम करतो,गफूरभाई हे कुठलाही भेदभाव न करता सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच धाऊन जाणारे एक सच्चे वेक्तीमहत्व आहे,
यावेळी पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा राणीताई पांडीयन , देहूरोड शहर महिला अध्यक्षा वैशाली जगताप , उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी , किसान काँग्रेस देहूरोड शहर अध्यक्ष संभाजी पिंजण , सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव , सुखदेव निकाळजे , अशोक कूसळे , माणिक वाघमारे , बबन टोम्पे , चंद्रशेखर मारीमुत्तु , वर्धाराजण मारीमुत्तु , अय्यप्पा मारीमुत्तु , तसेच महिला कार्यकर्त्या दीपा जगले , गीता रजलिंगम रामनारायण , अंजनी राजू सेंगयानि , लता पात रकर , तवमनी राजू अमावशी सिंधु शिरसाट , युवा महिला कार्यकर्त्या अनिता हाजिमलंग मारीमुत्तु , शारदा रेड्डी , सईदा गोलंदाज , उपस्थित होते,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*