प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : महागाई मोदी सरकारने 2-3 वर्षांपासून ही वाढविली आहे.त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्याचा निषेध सर्वसामान्य जनता, विविध पक्ष , विविध संघटना करत आहेत. दिवाळी आली तरी मोदी सरकारने महागाई कमी केली नाही.त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काही दिवसापूर्वी विविध पक्षांनी आंदोलन केले होते. आज परत राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने अख्या राज्यभरात प्रत्येक भाजप खासदार - आमदार यांच्या कार्यालयात जाऊन गॅस दरवाढ विरोधात पत्र देण्यात आले
पुण्यात पण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयात गॅस दरवाढ विरोधात पत्र लिहून अनोखे आंदोलन केले गेले.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष मृणाल वाणी, नीता गलांडे, पूनम पाटील, सोनाली उजागरे, प्राजक्ता जाधव, सविता मारणे, स्वाती गायकवाड, श्वेता होनराव, सारिका पारेख, ज्योती सूर्यवंशी, भावना पाटील वनिता जगताप, वनिता नलावडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकत्या उपस्थित होत्या.
मृणाल वाणी म्हणाल्या, या केंद्र सरकारला लाज वाटायला पाहिजे दिवाळी आली तरी महागाई कमी केली नाही. दिवाळी एवढा मोठा सण आहे. केंद्र सरकारने तर महागाई कमी केली असती .तर. गोर गरिबांची दिवाळी मोठ्या उत्साहात झाली असती. जोपर्यंत केंद्र सरकार महागाई कमी करत नाही. तोपर्यंत आम्ही अख्या राज्यभर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आंदोलन करणार.