देहू कमान येथे रात्रीच्या सुमारास भीषण अपघा

 भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू , चालक वैजनाथ कैलास खाडे वय ३०, रा. देहुगाव, हवेली याला अटक

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहुगाव कमान येथे गुरूवारी  रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.ऋतुजा अनिल जाधव वय २६ असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती अनिल आनंदा जाधव वय ३१ रा. आळंदी, हवेली यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर चालक वैजनाथ कैलास खाडे वय ३०, रा. देहुगाव, हवेली याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लहान मुलाला मोटरसायकलवरून दवाखान्यात घेऊन जाणा-या दाम्पत्याचा देहुगाव कमान येथे भीषण अपघात झाला. या आपघातात आयशर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे तर, मुलाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे. देहुगाव


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post