दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पुणे : कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावली मध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत निवेदन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष ललित गांधी आणि कॅटचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण कॅटची मागणी केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील मात्र, एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संबंधीच्या विविध निर्बंधांमुळे मुळातच व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. आता कुठे व्यापार सुरळीत व्हायला सुरुवात झाली

Post a Comment

Previous Post Next Post