विधवा पत्नीच्या नावे मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी

  २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन .


अनवरअली शेख :

पुणे : कोरोनामुळे किंवा अन्य कारणाने मयत झालेल्या मालमत्ताधरकांचे वारस म्हणून असणाऱ्या विधवा पत्नीच्या नावे मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत विशेष शिबिर आयोजित केले आहे .

या कालावधीत सर्व १६ कर संकलन विभागीय कार्यालयात मिळकत हस्तांतर शिबिर होणार आहे. महापालिकेचे करसंकलन विभागाचे दप्तरी नोंद असलेल्या ज्या मालमत्तेचे मालक म्हणून विधवा पत्री व त्यांचे पती यांचे नाव असेल अथवा विधवा पत्नी यांचे फक्त पतीचे नाव असेल अशा मालमत्तांच्या प्रकरणी शिबिर कालावधीत तात्काळ मिळकत हस्तांतर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मालमत्ता हस्तांतर करण्याकरिता मिळकत कराचे बिल, पतीचा मृत्यू दाखला, पती व पत्नींचे आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच मालमत्ता हस्तांतर फी भरणा करणे आवश्यक आहे. या शिबिरामध्ये ज्या मालमत्ताधारकांना कोविड १९ चे प्रादुर्भावामुळे मालमत्ता कराची थकबाकी भरणा करणे शक्य होत नाही, अशा विधवा अर्जदारांकडून भविष्यात मालमत्ता कर भरणा केला जाईल.

या अधिन राहून कराची थकबाकी असतानाही मालमत्तेचे हस्तांतर करुन देण्याबाबत विशेष सवलत देण्यात येणार आहे. याकरिता संबंधितांनी अर्जासह स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ नजीकच्या कर संकलन विभागीय कार्यालयात जाऊन संबंधितांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post