प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : राज्यशासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे.त्यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरात असलेल्या एका हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या गोदामात केली.
शहेजाद अश्रफ रंगुनवाला (वय 37), नावेद मुन्ने खान (वय 21), शफीक महंमद मालापुरी (वय 18, तिघे रा. लेक डिस्ट्रीक्ट सोसायटी, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीच्या परिसरात तळमजल्यावरील गोदामात हुक्का साहित्यतसेच सुगंधी तंबाखुची साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, सुगंधी सुपारी असा एकूण 22 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.