प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात संप पुकारला आहे. त्यामुळे शहरात सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय होत आहे. न्यायलायने संप मागे घेण्यास सांगूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत, सरकारचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु आहे.
सर्वसामान्य प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने सर्व खाजगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संप मागे घेई पर्यंत मान्यता दिली आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे पुणे कार्यक्षेत्रातील प्रवाशांना खाजगी बस सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक आज आयोजित करण्यात आली होती. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारुन कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.