प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : फक्त गोव्यात विक्री करण्यासाठी परवानगी असतानाही मद्यसाठा असलेला ट्रक पुण्यात आणल्याने उत्पादन शुल्क विभागाने केली धडक कारवाई . या कारवाईत वाहनांसह तब्बल 52 लाख 42 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
ट्रक चालक कृष्णा तुळशीराम कांदे (वय 30) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमानुसार तसेच फसवणूक, बनावट पद्धतीने मद्यविक्री करत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी परिसरात फक्त गोव्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेला एक मद्याचा ट्रक आला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने सापळा रचून हा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचा 52 लाख 42 हजार रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.