रवी कचरू नागदिवे असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे- अनैतिक संबंधाच्या संशयातून सुरक्षा रक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली आहे. रवी कचरू नागदिवे असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मृत नागदिवे हा उरळी देवाची येथील शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.घटनेच्या दरम्यान तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आपल्या रिक्षाचालक मित्र बालाजी सोबत येवलेवाडी येथील मैत्रिणीच्या प्लॅटवर आला होता.
महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय
याचवेळी येवलेवाडी येथील प्लॉटींगच्या सुपरवायझरसह इतर काही जणांना मृत नागदिवेचे संबधित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. भाड्याने दिलेल्या खोलीचा गैरवापर करत असल्याचा रागही आला. यातूनच त्यांनी मृत नागदिवे व बालाजी यांना येवलेवाडी येथे भेटण्यास बोलावले. ते दोघे भेटण्यासाठी आले आता सुरू असलेल्या प्रकारावरून चार पाच जणांच्या टोळक्याने नागदिवे याला लाथा बुक्कायनी आणि बांबूने मारहाण केली. यामध्ये नागदिवे याचा मृत्यू झाला आणि रिक्षाचालक बालाजी हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी चार जणांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे.