प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे आझम कॅम्पस दि १२ नोव्हेंबर अफगाण मधील परिस्थिती अस्थिर झाल्यानंतर मानवतावादी भावनेतून दीड महिना पुण्यातील १८५ अफगाण विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल अफगाण वाणिज्य दूतावास प्रमुख झाकिया वार्डाक यांनी बुधवारी आझम कॅम्पसच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आभार व्यक्त केले.आझम कॅम्पस तर्फे १४ लाख रुपये खर्चून या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली .
बुधवारी झाकिया वार्डाक यांनी आझम कॅम्पस मधील शैक्षणिक आस्थापनांना भेट देऊन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची भेट घेतली. यावेळी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शैला बूटवाला उपस्थित होत्या. आझम कॅम्पस मधील अफगाणी विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी डॉ पी ए इनामदार यांनी केली .
--------------------