शिरुर शहरातील मागासवर्गीय भागासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने मिळविला पन्नास लाखांचा निधी.

 बहुजन मुक्ती पार्टी सत्तेत नसतानाही सर्वसामान्यांसाठी निधी मिळवला ही पक्षाची मोठी उपलब्धी आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : शिरुर नगर परिषद हद्दीतील मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने केलेल्या पाठपुराव्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यसन अधिकारी मा. प्रवीण शिशुपाल साहेब यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी प्रभागनिहाय विकासकामांना दुर्लक्षित केले असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे होते, त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन देऊन दुर्लक्षित भागासाठी विकास निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. 

निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाचे कार्यसन अधिकारी मा. प्रवीण शिशुपाल साहेब यांनी आपल्या शहरातील मागासलेल्या भागाच्या विकास कामांसाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बहुजन मुक्ती पार्टी ने सत्तेत नसतानाही सर्वसामान्यांसाठी निधी मिळवला ही पक्षाची मोठी उपलब्धी आहे.

मंजूर झालेली कामे

१) बी. सी. हौसिंग सोसायटी ता.शिरूर येथील श्री नितीन कोठावळे यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे (20 लाख रुपये) 

२) बीसी हौसिंग सोसायटी येथील

अशोक गुळादे यांच्या घरापासून ते पाबळ फाटा पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (10 लाख रुपये) 

३)सय्यद बाबानगर येथे आर ओ प्लांट बसविणे, पथदिवे बसविणे (5 लाख रुपये) 

४) बुरूड आळी ते माता रमाई नगर ते कसाई मोहल्ला पर्यंत अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, आर ओ प्लांट व पथदिवे बसविणे (15 लाख रुपये)

बहुजन मुक्ती पार्टी ने शिरूर शहराचे सुपुत्र तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यसन अधिकारी मा प्रवीण शिशुपाल साहेब यांचे आभार मानले आहे.

शहरातील नागरिकांनी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांचे  सर्व स्थरावर कौतुक केले  जात आहे,व आंनद व्यक्त केला. 



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क अन्वरअली शेख 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post