पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पिंपरीत 98 टक्के मतदान झाले.

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकी साठी मोठे नागरी मतदार संघात (पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका) पिंपरीत ९८% टक्के मतदान झाले.

 या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी दि.१२,रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक पुणे आणि पिंपरी महापालिका मुख्यालयात मतदान झाले. या मतदारसंघात  २२ जागा असून २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे ७ आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे १० उमेदवार आहेत.१२४ नगरसेवकांपैकी १२२ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर, परगावी असल्याने शिवसेनेचे १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ असे २ नगरसेवक मतदान करु शकले नाहीत.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post