बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौटने केलेल्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे पुण्यात करण्यात आला.

 हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट हिने एका मुलाखती दरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे पुण्यात बालगंधर्व चौक येथे करण्यात आला.हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

'रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं आहे.असे कंगना रनौट हिने वक्तव्य केले होते या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला.

ह्या निषेध आंदोलनला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, प्रदीप देशमुख, सुषमा सातपुते पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर अध्यक्ष, स्वाती गायकवाड, सविता मारणे, पुणे शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने जे भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. ते एकदम चुकीचे आहे. आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दिली आहे. कंगना राणावत या भाजप पक्षाच्या आहेत. भाजप पक्षानि याचे उत्तर द्यावे . व कंगना राणावत हीने माफी मागावी. अशी आम्ही मागणी करत आहोत. कंगना राणावत या वक्तव्याचा निषेध आम्ही आज या आंदोलनातून करत आहोत असे प्रशांत जगताप म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post