प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पुणे : कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौट के घर ना आये. या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले.पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना दिली. भारत माता की जय. शहीद जवान, पोलीस अमर रहे. च्या घोषणांनी सारसबागेचा परिसर दुमदुमून गेला.
मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे सारसबागे मध्ये मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सागर पाटील, सहपोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, रमाकांत माने, आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, जगन्नाथ कळसकर, स्वाती देसाई, सोमनाथ जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी सी.एच.वाकडे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे यंदा ९ वे वर्ष होते.
डॉ.अमिताभ गुप्ता म्हणाले, 26/11 च्या घटनेमध्ये जे शहीद झाले, ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. काही पोलीस आमचे सहकारी होते, तर काही वरिष्ठ म्हणून त्यावेळी कार्यरत होते. जे हुतात्मा आपल्यासाठी शहीद झालेले आहेत, त्यांचे दहशतवाद मुक्त भारताचे स्वप्न आपण पूर्ण करण्याकरीता सर्तक रहायला हवे.रुपाली चाकणकर म्हणाल्या, प्राणाची आहुती देत शेवटच्या क्षणापर्यंत लढणा-या पोलीस बांधवांना आदरांजली अर्पण करीत आहोत. महापूर, भूकंप, कोविडसह सर्वच संकटात पोलीस, सैनिक कार्यरत असतात. संविधान दिन देखील आज आहे. डॉ.आंबेडकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य दिले. त्यांना देखील आज आदरांजली अर्पण करीत आहोत.
चित्रकला स्पर्धेचा निकाल :-
अ गट (इयत्ता १ली ते २री) - भूमी संगवार, वैष्णवी श्रीवास्तव, तन्मय देखणे, आर्यन चव्हाण, समर्थ तळेकर, ब गट (इयत्ता ३री ते ४ थी) - यशवंत गुप्ता, आर्यन पत्की, सनुजा पाटील, झोया वडसरीया, सात्विक गायके, सना नायकवडी, क गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) - प्रथमेश वाघ, वेदांत पवार, समृद्धी अर्जुन, प्राची गुत्तेदार, सम्यक राऊत, यश गव्हाणे, संजना नावडकर, ड गट (इयत्ता ८वी ते १० वी) - सिद्धी कांबळे, श्रुती कांबळे, आकाश दुबे, संस्कार कळमकर, त्रिशा गोसके, सुश्मिता चट्टा, इशा ओड.