प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका ज्येष्ठ महिलेचा भरदिवसा खून करून अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी या घटनेतून तब्बल पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शालीनी बबन सोनावणे वय ७०, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हा प्रकार घडला.
या प्रकरणी अधिक माहिती, मयत शालिनी सोनवणे या निगडी खुर्द परिसरात वास्तव्यास होत्या. त्या एकट्याच राहत होत्या. शनिवारी रात्री त्यांचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी घरी गेला असता त्यांना आई हॉलमध्ये पडल्याची दिसून आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी घरातून पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
*जवळच्या व्यक्तीने घात केल्याची शक्यता…*
मयत शालीनी सोनवणे यांच्या गळ्यातील ४ ते ५ तोळे सोन्याच्या दागिन्याला चोरट्याने हात लावला नाही. तर कपाटात रोकड व इतर दागिने देखील होते, तेही तसेच आहेत. शालीनी या ओळखीचा असेल तरच घरात घेत असत. त्यामुळे हा खून जवळच्या कोणी केला आहे का याची शक्यता धरून पोलीस तपास करत आहेत.