त्रिपुरा मध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या हल्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज रस्त्यावर..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
त्रिपुरा येथील अमाणवीय घटनेच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात शांततेत मुस्लिम समाजा तर्फे मोर्चा काढण्यात आला. देशात पसरत असलेल्या अराजकता तसेच त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजाच्या विरोधात अन्याय व अत्याचार झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी दि,१२ नोव्हेंबर रोजी विरोध धरणे आंदोलन करण्यात आले .
भारत देशा मध्ये संविधानाने सर्व धर्म समभाव व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिलेला असतांना " त्रिपुरा " सारख्या छोट्या राज्यामध्ये एकूण मुस्लिम समुदायांची लोकसंख्या फक्त ८% टक्के आहे, म्हणजे ३६ लाख पैकी ३ लाख इतकेच मुस्लिम अल्पसंख्याक राहतात याचाच गैर फायदा उचलत काही समाज कंटकांनी कित्येक अराजकता माजवली,विशेष धर्माच्या लोकांच्या वस्त्यांवर हल्ले चढवले, घरामध्ये घुसून महिलांवर अत्याचार , नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मागील काही दिवसांपासून आपल्या देशाला लाजवेल असे कृत्य केले जात आहे सदर घटने मध्ये अद्याप कोणालाही अटक देखील करण्यात आलेली नाही किंवा त्याच्यावर कुठलीही कार्यवाही देखील करण्यात आलेली नाही हे जर असेचं चालत राहिले तर देशात कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण होईल .
आज म्हणून मुस्लिम समाज एकत्र येऊन पंतप्रधान यांच्याकडे काही प्रमुख मागण्या करीत आहेत , १ ) त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर अन्याय , अत्याचार झाला आहे त्याची CID मार्फत तात्काळ तपास करून योग्य ती कारवाई करावी २ ) त्रिपुरा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ३ ) मौलाना कलीम सिद्दीकी साहेबांना मुक्त करून त्यांच्यावरील सर्व गुन्हे माघार घेण्यात यावे ( ४ ) जो जाती वादि संघटना आणि सामाजिक अत्त्व अशी अराजकता निर्माण करत आहे त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी ५ ) पिंपरी चिंचवड चे वातावरण खराब करण्याचे काम चालू आहे हिंदुराष्ट्र सेने चे प्रमुख धनंजय देसाई हे पिंपरी चिंचवड मध्ये विष पेरण्याचे काम करतात त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी ह्या प्रकारच्या मागण्या करत पिंपरी चौकात बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले,
या वेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते व मौलाना गफ्फार आश्रफी,मौलाना उमेर गाजी, कारी इकबाल उस्मानी,मौलाना आलीम इत्यादी उपस्थित होते,