बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून राष्ट्रपतीना निवेदन

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 त्रिपुरा राज्यात विश्व हिंदू परिषद व हिंदू जागरण मंचाच्या माध्यमातून  भारतीय समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मुसलमानांच्या धार्मिक स्थळांवर मदरशांवर व घरांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या देशव्यापी सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा उत्तर विभाग युनिटच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून निवेदन देण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मा.अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड शहर यांचे माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले आहे.सदरचे निवेदन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा पिंपरी चिंचवड शहर संयोजक मा.गौस सुनार,यांनी सादर केले.

यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे मावळ तहसील प्रभारी मा. अन्वरअली शेख  ,सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघाचे राज्य प्रभारी मा.सुरेश भालेराव, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब धावारे,छत्रपती क्रांती सेना पुणे जिल्हा(ऊ)प्रभारी मा.दिनकर जाधव, राष्ट्रीय मूलनिवासी पेन्शनर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष  मा.गोविंद हेरोडे, RMBKS ऑटोरिक्षा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष मा.दादाभाऊ ओव्हाळ, बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा महासचिव मा.महादेवराव लोखंडे, यांचे प्रमुख उपस्थितीत  दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी मा. अप्पर तहसीलदार यांना सादर केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post