निगडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला
प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
पिंपरी – शहरातील यमुनानगर, निगडी परिसरात पतीचे दुसऱ्या महिले सोबत असलेले प्रेम संबंध पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याबाबत मृत महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृत बहिणीचे पती युवराज घारगेच तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. निगडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भावाने केले हे आरोप
मृत बहिणीच्या पतीचे लग्नांनंतरही बाहेर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधावरुन पती सातत्याने बहिणीचा मानसिक छळ करत तिला मारहाण करायचा. अनेकदा अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत असे. मात्र एक दिवस सर्व काही ठीक होईल या आशेवर बहीण निमूटपणे सर्व काही सहन करत राहिली. अखरे मानसिक ताण सहन न झाल्यानेच तिने घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती भावाने दिली आहे.
नातेवाईकांमध्ये आरोपांबाबत व्यक्त होतंय आश्चर्य
महिलेने केलेले आत्महत्येबाबत हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे आत्महत्या हा शेवटचा पर्याय असूच शकत नाही, ही भावना अनेक नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच भावाने केलेले आरोपापाबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पती-पत्नीचे पटत नव्हेत तर पती पासून विभक्त होता आले असते. आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयामुळं स्वतःचंच नुकसान करुन घेतल्याची चर्चाही संबधितांमध्ये सुरु आहे.