निगडी ते देहूरोड दरम्यान हायवेवर अनधिकृत पार्किंगचा बनलाय अड्डा..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
हायवे रोड वर रहदारीच्या रस्त्यावर विनापरवानगी वाहने पार्कीग केली जात आहे , नवीन उड्डाणपूला वरून सुसाट वेगाने येणाऱ्या मोठ्या वाहनांची तारांबळ होत आहे, भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,अपघात झाला तर त्याचा जवाबदार कौन? असा जाब अवजड वाहतुक सेना संघटक शुभम हेमंत जार्वेकर यांनी विचारला आहे,
रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणारे पार्किंग करतात पण जर त्या ठिकाणी अपघात घडला तर अपघात ग्रस्तांची दूर दशा होते आर्थिक परिस्थिती बिघडते,जर जीव गमवावा लागला तर पाठीमागे असलेल्या कुटुंबावर दुःखा चे डोंगर कोसळते, या सर्व प्रकारच्या घटनेस जवाबदार कोण. ?
निगडी ते देहूरोड या राष्ट्रीय महामार्गावरील पुणे गेट व गोल्डन फार्म या दोन नामांकित हॉटेल समोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुस अनधिकृत रित्या वाहने पार्क केले जात आहेत . त्यामुळे रोज अपघात होत आहेत व भविष्यात गंभीर अपघात होऊन कोणाचाही मृत्यु होण्याची दाट शक्यता आहे . सबब वंरील प्रकरणात आपण लक्ष घालुन योग्य ती कारवाई करावी .अशी मागणी शिवसेना अवजड वाहतुक सेना या संघटने कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड व पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग देहूरोड यांना करण्यात आली आहे,